अजय चोथमल
सहसंपादक मालेगाव
मालेगाव तालुक्यातील ग्राम कोळदरा येथील कु. कोमल श्रीकृष्ण ठाकरे हिचा दि. 11 सप्टेंबर 2022 रविवारी रोजी जिल्हा परिषद शाळा कोळदरा येथे विविध आदिवासी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोळदरा येथे दि. 5 सप्टेंबर सोमवारी रोजी येथील कु. कोमल श्रीकृष्ण ठाकरे गावालगत असलेल्या शेतातील विहरी वर पाणी भरण्यासाठी गेली आसता. या ठिकाणी येथील महिला सिंधुबाई लठाड विहरी मध्ये भुरळ येऊन विहरी मध्ये पडली. या वेळी मोठ्या हिमतीने कु. कोमल हिने विहरीत दोर टाकून सिंधुबाईला दोर टाकून वाचविले. वर्ग आठवी मध्ये शिकत असलेल्या कु. कोमल श्रीकृष्ण ठाकरे हिची हिम्मत पाहता कोळदरा येथील कु. कोमलचे पुष्पहार घालून व शाल श्रीफळ, माता सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन स्वागत केले.
या वेळी भारतीय अस्मिता पार्टिचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम माहोरे साहेब, आंनदा पवार ( अखिल भारतीय संघटना विकास परिषद वाशिम), संतोष मेटांगे ( आदिवासी अस्मिता संघटना जिल्हा अध्यक्ष वाशिम ), रविद्रं सावरकर सर, आत्माराम धंदरे ( माजी जिल्हा परिषद सदस्य), राजु व्यवहारे, किसन भुरकाडे सर, विलास धोंगडे, व गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.