प्रतिष्ठान रास दांडिया महोत्सव २०२२ निमित्त भव्य दिव्य स्त्री सन्मान मिरवणूक व उद्घाटन सोहळा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला - JDM

JDM


Breaking

Tuesday, September 27, 2022

प्रतिष्ठान रास दांडिया महोत्सव २०२२ निमित्त भव्य दिव्य स्त्री सन्मान मिरवणूक व उद्घाटन सोहळा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला

प्रतिष्ठान रास दांडिया महोत्सव २०२२ निमित्त भव्य दिव्य स्त्री सन्मान मिरवणूक व उद्घाटन सोहळा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
पैठण प्रतिनिधी
दीपक घटे
मंगळवारी दिनांक २७ (दुसरी माळ) पैठण शहरात छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा पैठणचे लोकनियुक्त मा.नगराध्यक्ष सुरजशेठ लोळगे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या प्रतिष्ठान रास दांडिया महोत्सव २०२२ निमित्त भव्य दिव्य स्त्री सन्मान मिरवणूक व उद्घाटन सोहळा शिस्तबद्ध वातावरणात  तब्बल चार तास हजारो पैठणकरांनी याची देही याची डोळा अनुभवला
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने मोठा उत्साह पहायला मिळाला. 
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते श्री नाथ हायस्कूल मैदानापर्यंतची सन्मान मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. सर्वधर्मीय नागरिकांचा विशेषतः विद्यार्थीनी व महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला. 

शैक्षणिक, शासकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रात पैठणचे नाव उंचवणाऱ्या होतकरू  विद्यार्थीनी व कर्तुत्ववान महिलांचा या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, प्रतिष्ठान परिवाराच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.