आजच्या नव्या पिढीला, महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज ; पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे
शौकतभाई शेख
श्रीरामपूर प्रतिनिधी
चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला "जागर महापुरुषांच्या विचारांचा" असा स्तूत्य कार्यक्रम आपण कुठेही पाहीला,ऐकला नसल्याचे श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण अधिकारी महिला बालकल्याण विभाग विलासराव बागुल आणि चर्मकार संघर्ष समिती,त्रिदल सैनिक सेवा संघ, परिवर्तन फाऊंडेशन पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमती देवरे म्हणाल्या की,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपराव शेंडे (सर) यांच्या कौशल्यनगर, मार्केट यार्ड श्रीरामपूर येथील त्यांच्या निवासस्थानी केवळ राज्यातच नव्हेतर संपूर्ण देशात प्रथमच असा सामाजाभिमुख आणि स्तूतीजन्य उपक्रम राबवत असल्याचे पाहुन मोठा आनंद होत आहे, आजच्या तरुण पिढीला महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच मी आजपर्यंत असा महापुरुषांच्या विचारांचा जागर असलेला उपक्रम केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात कुठेही पाहिलेला नाही. आजचा कार्यक्रम हा निश्चितच भरकटलेल्या पिढीला,सामाजिक एकतेसाठी तसेच विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आदर्श नागरिक घडविण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीने सुरू केलेला उपक्रम मोठ्या फायद्याचा ठरेल,हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि ऐतिहासिक असून भविष्यात या छोट्या रोपटेचे वटवृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही,आज संस्कारासोबत आई-वडिलांची मैत्रीपूर्ण सोबत मुलांना हवी आहे, आज आपली मुलं काय करतात?, कुठे जातात ?, त्यांचे मित्र कोण आहेत ?, हे पालकांना माहिती असणे गरजेचे आहे, मुलांना समजून घेणे, त्यांना चांगले - वाईट मित्र हे योग्य रितीने समजावून सांगणे आणि महापुरुष कोण होते ?, त्यांचे कार्य काय ?, त्यांचे विचार आपण अंमलात आणणे नितांत गरजेचे आहे, आज मला अशा वैचारिक परिपक्वता असलेल्या महान उपक्रमाला भेट देण्याचे भाग्य लाभले म्हणून मी खरोखर खुपच भाग्यवान ठरले.आपण आपल्या महापुरुषांना विसरत चाललो आहे की काय ?, आणि असे होऊ नये म्हणून आज श्री. शेंडे (सर) आणि चर्मकार संघर्ष समिती यांनी हा जो कार्यक्रम सुरु केला आहे त्या उपक्रमास माझ्या खूप खूप मनस्वी शुभेच्छा,मला अभिमान वाटतो की अशा उपक्रमांद्वारे थोरमहापुरुषांच्या विचारांचा जागर चर्मकार संघर्ष समिती सर्वांपूढे नेत आहे, खरेतर अशा उपक्रमांद्वारे समाजात व संपूर्ण देशात जनजागृती होणे गरजेचे आहे. तरच आपला देश या महापुरुषांच्या विचारधारेवर टिकून राहू शकेल असेही त्या म्हणाल्या.
यावेळी संस्थेचे जिल्हा संघटक दिलीपराव शेंडे (सर) बोलताना म्हणाले की,सलग दहा दिवस रोज सायंकाळी ६ ते ८ महापुरुषांच्या विचारांचा जागर हा अभिनव असा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामाच्या माध्यमातून थोर महापुरुषांच्या विचारांचा जागर दररोजच विविध मान्यवरांच्या माध्यमातून व्याख्यानमालेद्वारे समस्त समाजाला दिला जात आहे. महापुरुषांचे कार्य ,त्यांचे विचार ,संस्कार यांची माहिती आजच्या पिढीला,विद्यार्थ्यांना आणि समाजातील सर्वांना व्हावी. या उद्देशाने चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर द्वारे हा एक आगळा- वेगळा उपक्रम सुनियोजनबद्ध पद्धतीने सलग १० दिवस राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विलासराव बागुल (संरक्षण अधिकारी महिला बालकल्याण समिती) यांनी महिला अत्याचार, त्यांचे हक्क, कौटुंबिक समस्या यावर भरपूर प्रमाणात माहिती सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे आणि विलासराव बागुल यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमाला नायब तहसीलदार अमोल एडके, दैनिक सार्वमत चे उपसंपादक राजेंद्र बोरसे, समितीचे जिल्हाध्यक्ष - संजय दळवी, महिला जिल्हाध्यक्षा - सुनंदा शेंडे, शहराध्यक्षा - इंदुताई नन्नवरे, जिल्हा संघटक - दिलीपराव शेंडे (सर),कार्याध्यक्ष - प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपाध्यक्षा- सोनल वाघमारे, जिल्हा उपाध्यक्षा- मनीषा कानडे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव कानडे, अशोकराव खैरे (सर), मोहिनी खैरे,जिल्हा सहसचिव - आशा दळवी, जिल्हा उपाध्यक्षा -
संगीता क्षिरसागर, रामनाथ सोनवणे ,संतोष देवराय, विठ्ठल शेंडे, बाळासाहेब चव्हाण, बर्डे सर ,बर्डे मॅडम तसेच अमोल ननवरे, योगा प्रमुख राखी सुरडकर, परिवर्तन फाऊंडेशन, त्रिदल सैनिक सेवा संघ,चर्मकार संघर्ष समिती सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.