शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
केलवड येथिल ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये गरिब तसेच गरजु विद्यार्थ्यांना साईबाबा सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप
दिनांक ४/७/२०२२ रोजी केलवड येथिल ज्ञानेश्वर विद्यालय येथील, शिक्षण घेत असणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या गरीब मुला मुलींना तसेच कोरोना कालावधीत ज्या मुलांचे आई-वडील मयत झालेले आहेत अश्या शालेय विद्यार्थ्यांना, मा.श्री.राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर (भा. ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष) ह्यांच्या नेतृत्वाखाली तसेंच साई बाबा सेवा भावी संस्था चे संस्थापक अध्यक्ष, तसेच केलवड येथील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री रमेश दगडू वाघे ,समाजसेवक मा, श्री महेशभाऊ नानासाहेब रेवगडे पाटील(छत्रपती युवा सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष), मा. श्री विकी जोर्वेकर ह्यांनी संस्थेच्या वतीने आणि आमचे मुंबई येथिल मित्र श्री सुनिल सर धुतिया,संदिप सर शेट्टी,सतिषकुमार चंन्डा व सुधिर आचार्य यांच्या आर्थिक मदतीतून ,शालेय विद्यार्थ्यांना ,शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच ह्या पुढे देखील अनेक गरजू विद्यार्थ्यांना अशीच अविरत मदत करत राहण्याचे आव्हान मा. श्री रमेश भाऊ वाघे ,तसेच मा.श्री महेश भाऊ रेवगडे ह्यांनी केले,त्या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक ,श्री.गायकवाड सर,श्री जेजुरकर सर,आदी शिक्षक तसेच शिक्षिका उपस्थित होते ,ह्या कार्याची दखल घेत मुख्याध्यापक ह्यांनी संस्थेचे तसेच सर्व दानशूर साईभक्तांचे ,आभार व्यक्त केले,
अधिक माहितीसाठी संपर्क :
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS