संभाजी कांबळे
घनसावंगी पोलिसांत तक्रार दाखल
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी मंदिर परिसरात मंदिर ट्रस्ट व जीवनज्योति सामाजिक, सांस्कृतिक संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी अल्प दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सामाजिक कार्य म्हणून जार प्लांट टाकला आहे. त्या प्लांटच्या शुद्ध केलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञात इसमाने दि.27 सोमवारी मध्यरात्री काहीतरी द्रव पदार्थ टाकल्याने पाणी लालसर झाले आहे. दरम्यान समर्थ रामदास स्वामी मंदिर ट्रस्टच्या वतीने घनसावंगी पोलिसांत दिं.28 मंगळवारी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सदरील घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला असून पाण्याचे नमुने घेतले आहेत.
लवकरच अज्ञात व्यक्तींचा शोध लावून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे श्री.मरळ यांनी सांगितले आहे.
दलित वस्तीतील विहिरीवरील पाईप लाईन फोडणे, स्टार्टर वायर याची नासाडी करणे बाबत सरपंच यांचेही निवेदन जांबसमर्थ येथील दलित वस्तीसाठी स्वतंत्र विहीर असून त्यामधून दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो,विहिरीवरील मोटारीचा पाईप फोडणे, स्टार्टर फोडणे व वायर तोडणे, फ्यूज बॉक्स फोडणे हे प्रकार गावातील अज्ञात व्यक्तीकडून असे वारंवार होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी सरपंच रामकीसन तांगडे यांनी केली आहे. दरम्यान दिवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
9011302859